शुगर कमी होण्यासाठी काय खावे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:05

Diabetes Tips : 15 दिवसांत कमी होईल Blood Sugar, कधीच भासणार नाही औषधांची गरज, फक्त ‘ही’ 5 कामं करणं सोडून द्या..!
Tips to Lower Blood Sugar Naturally: आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की, मी 5 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाच्या रुग्णांवर काम करत आहे. 1000 हून अधिक मधुमेहींचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यापैकी 96% पेक्षा जास्त लोकांमध्ये सकारात्मक परिणाम मिळाल्यानंतर मी तुम्हाला खात्री देते की या 5 गोष्टी टाळल्याने तुम्हाला 15 दिवसांत रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.
Control Blood Sugar in 15 Days: मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण ते नियंत्रणात ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकता. डॉक्टर आणि तज्ञ मधुमेही रुग्णांना निरोगी आहार आणि मध्यम व्यायामाचे पालन करण्याचा सल्ला देतात कारण या दोन पद्धती मधुमेह नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते ज्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याच्या वाढीमुळे जास्त तहान लागणे, जास्त लघवी होणे, अंधुक दिसणे, वजन कमी होणे अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही काही सोप्या पद्धती वापरून त्यावर नियंत्रण मिळवू शकता. मधुमेहावर आयुर्वेदिक उपचार काय आहे? आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की, मी 5 वर्षांहून अधिक काळ मधुमेहाच्या रुग्णांवर काम करत आहे. 1000 हून अधिक मधुमेहींचे मत जाणून घेतल्यानंतर आणि त्यापैकी 96% पेक्षा जास्त लोकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसल्यानंतर मी तुम्हाला खात्री देते आहे की या 5 गोष्टी टाळल्याने तुम्हाला 15 दिवसांत रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.
सुस्त जीवनशैलीपासून दूर राहा

मधुमेही रुग्णांनी दररोज ४० मिनिटे हालचाल (चालणे, सायकल चालवणे, कार्डिओ आणि योग) आणि २० मिनिटे दीर्घ श्वास घेणे (प्राणायाम) करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला मधुमेह रोखायचा असेल किंवा त्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया (blood circulation) सुरळीत राहून शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन, लिव्हर डिटॉक्स होणं आणि इन्सुलिनचा योग्य स्राव होण्यास मदत होते.
खाण्याच्या या गोष्टींपासून दूर राहा

साखर, मैदा (प्रक्रिया केलेले अन्न), दही आणि ग्लूटेन यांसारख्या गहू आणि गव्हाच्या उत्पादनांपासून दूर रहावे. त्याऐवजी अधिकाधिक फळे आणि भाज्या खाव्यात. गाईचे दूध आणि तूपही कमी प्रमाणात खावे. ज्वारी, नाचणी, राजगिरा, बाजरी या गोष्टी जास्तीत जास्त खाव्यात.
रात्रीचं जेवण उशीरा खा

रात्रीचे जेवण लवकर खाणे हा तुमची रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा म्हणजेच कार्डियोवॅस्कुलर डिजीज धोका कमी करण्याचा सर्वात सोपा व हेल्दी मार्ग आहे. शक्य असल्यास, सूर्यास्तापूर्वीच रात्रीचे जेवण करून घ्या. रात्रीचे जेवण रात्री 8 च्या आधी घेणे कधीही चांगले.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका

हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांना दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे. दिवसा झोपेमुळे शरीरातील कफ दोष वाढतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री देखील रात्रीच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी झोपण्याचा सल्ला एक्सपर्ट्सकडून दिला जातो.
फक्त डायबिटीजच्या गोळ्यांवरच अवलंबून राहू नका

एक निरोगी दिनचर्या न पाळणे आणि मधुमेहावरील औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहणे हे लहान वयातच तुमचे लिव्हर आणि किडनी खराब करू शकते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info